सौरऊर्जा प्रकल्पातील स्फोटात एक कामगार ठार, दोघे जखमी

प्रकाश काळे
शुक्रवार, 26 जुलै 2019

सौरऊर्जा प्रकल्पातील बिघाड दुरूस्तीचे काम सुरू असताना अचानक स्फोट होऊन एक कामगार ठार तर दोघे गंभीर जखमी झाले.

किल्ले धारूर : सौरऊर्जा प्रकल्पातील बिघाड दुरूस्तीचे काम सुरू असताना अचानक स्फोट होऊन एक कामगार ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. हा  अपघात शुक्रवारी (ता. 26) पहाटे तीन वाजता तालुक्यातील चाटगाव येथे घडला. दोन जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

धारूर तालुक्यातील चाटगाव येथे ‘तुल्य तुलाई सोलार प्रोजेक्ट’ नामक सौर उर्जा प्रकल्प आहे. शुक्रवारी पहाटे या प्रकल्पात अचानक बिघाड झाला. त्यामुळे जयराज जया बालन (वय 27), रामानंद रामरतन खारवाल (वय 23) आणि संपत कमलाकर शिंदे (वय 23, रा. सिरसाळा) हे तिघे कामगार दुरूस्ती करण्यासाठी तिथे गेले होते. दुरूस्तीचे काम सुरू असताना अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटात जयराज बालन 100 टक्के तर इतर दोघे 50 टक्के भाजले गंभीर भाजले. त्यांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान जयराज बालन याचा मृत्यू झाला. तर, शिंदे आणि खारवाल यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे. दरम्यान, हा स्फोटाचे कारण अद्याप समोर आले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 die in solar energy blast near kille dharur

टॅग्स