गेवराई तालुक्यात टँकरच्या धडकेत एक ठार

accident
accident

गेवराई : पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरच्या धडकेने एक ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता. 22) दुपारी तालुक्यातील भाटेपुरी येथे घडली. नवनाथ जगन्नाथ सागडे(वय 35, रा. भाटेपुरी, ता. गेवराई) असे ठार झाल्याचे नाव आहे. 

तालुक्यातील भाटेपुरी येथे पाणी टंचाई असल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. गुरुवारी पाणी पुरवठा करणारे टँकर (क्रमांक एम. एच. 12 व्ही. ए. 0171) हे गावात बारा वाजता आले होते. यावेळी गावातील नवनाथ जगन्नाथ सागडे (ड्रममध्ये पाणी भरत होते. यावेळी ड्रम भरत असतांना टँकरमागे आले असता भिंत व टँकरच्या मध्ये नवनाथ सागडे दबले व यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना गावातील नागरिकानी बीड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरने मयत झाल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com