व्यायाम करताना वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यु 

तुकाराम शिंदे
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

तीर्थपुरी (जालना) : जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील नारायण उर्फ नागेश काशिनाथ खंडागळे (वय 21) या तरुणांचा व्यायाम करताना अज्ञात वाहनांच्या धडकेत गुरुवारी (ता. 27) पहाटे पाच वाजेच्या दरम्यान जागीच मृत्यू झाला.

याविषयी अधिक माहिती अशी, की पहाटे येथील तरुण व महिला मोठ्या संख्येने व्यायाम करण्यासाठी तीर्थपुरी घनसावंगी रस्त्यावर व्यायाम करण्यासाठी जात असतात. नारायण हा तरुण नेहमी प्रमाणे व्यायाम करण्यासाठी घनसावंगी रस्त्यावररील 33 के.व्ही.केंद्रा जवळ व्यायाम करताना अज्ञात वाहनाने जबर धक्का दिल्याने नारायणचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच गावातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गोंदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल परजने यांनी घटनास्थळाला भेट दिली.गोंदी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृताचे प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असल्याचे जमादार गाढवे व पोलिस शिपाई बी.व्ही.शिंदे यांनी सांगितले.

Web Title: 1 dies in accident while exercise