ट्रॅक्टर विहिरीत कोसळुन एक ठार

dead_body
dead_body

सेलू : हादगाव पावडे (ता. सेलू) शिवारातील एका शेतात विहिरीचे खोदकाम सुरु असताना ट्रॅक्टर विहिरीत कोसळुन चालक जागीच ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी सेलू पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. 

हादगाव पावडे (ता.सेलू) शिवारातील भिकन अंभोरे यांच्या गट क्रमांक. 81 मधील शेतात विहिर खोदण्याचे काम सुरु आहे. रविवारी ब्लास्टींग करणारे ट्रॅक्टर विहिरीचे खोदकाम ब्लास्टींगच्या सहाय्याने करत होते.हे काम सुरु असतांना ट्रॅक्टर चालक शेख शकिल शेख जानिमिया (वय 30) यांचा ट्रॅक्टर वरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळले यात ट्रॅक्टर चालक शेख शकिल यांचा जागीच मृत्यु झाला. या प्रकरणी शेख चांद शेख अहमद यांच्या फिर्यादीवरुन ट्रॅक्टर चालक मयत शेख शकिल शेख जानिमिया यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सदरिल घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक डाॅ.नितिन काशिकर हे करित आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com