जालना - पारडगाव शिवारात एकाच खून

 सुभाष बिडे
सोमवार, 21 मे 2018

घनसावंगी (जालना) : घनसावंगी तालुक्यात पारडगाव शिवारात गट नं. 207 अंकुश वाशांबर गायकवाड (वय 65, धंदा मजुरी रा.कैकाडी मोहल्ला परतुर ) यांचा गाळा चिरुन खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (ता.21) उघडकिस आली.

अंकुश वाशांबर गायकवाड हे रविवारी पारडगाव येथे आठवडी बाजाराला आले होते. बाजार झाल्यानंतर ते शेळ्या घेऊन परतुरला निघाले होते. परंतु ते घरी न आल्याने त्यांच्या नातेवाईकाने शोधले असता सोमवारी सकाळी त्यांचा मुलगा लक्ष्मण गायकवाड यांना त्यांच्या मृत देह पाडगाव शिवारा आढळून आला.

अंकूश गायकवाड यांचा गळा चिरुन तसेच तिक्षण हत्याराने पोट, हात, पायवर वार करून ही हत्या करण्यात आली आहे.  यानंतर घनसावंगी पोलिसांना कळविण्यानंतर पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलिस उपनिरीक्षक जनक पुरी, जमादार मनसुरे, जी.जी.मदन यांनी घटनास्थळी भेट देउन पंचनामा केला. मृतदेहाची  उतरतपासणी रांजणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविन्यात आला.  दरम्यान श्वान पथकास पाचारण करण्यात आले , परंतु माघ निघला नाही.

Web Title: 1 murder at paradgao farm in jalna district