टेंपो- टॅंकर धडकेत १० वऱ्हाडी ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

मुखेड - वऱ्हाडाचा टेंपो आणि टॅंकरच्या समोरासमोर धडकेत दहा जण ठार तर २८ जण जखमी झाले. जखमींपैकी दोघे अत्यवस्थ आहेत. मृतांत सात महिलांचा समावेश आहे. जांब (ता. मुखेड) जवळ शनिवारी (ता. १२) सकाळी सव्वानऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना मुखेड, अहमदपूर, लातूरच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त वऱ्हाडी लातूर जिल्ह्यातील आहेत.

मुखेड - वऱ्हाडाचा टेंपो आणि टॅंकरच्या समोरासमोर धडकेत दहा जण ठार तर २८ जण जखमी झाले. जखमींपैकी दोघे अत्यवस्थ आहेत. मृतांत सात महिलांचा समावेश आहे. जांब (ता. मुखेड) जवळ शनिवारी (ता. १२) सकाळी सव्वानऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना मुखेड, अहमदपूर, लातूरच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त वऱ्हाडी लातूर जिल्ह्यातील आहेत.

खरोसा (ता. औसा, जि. लातूर) येथील कोंडिबा नारंगे यांचा मुलगा लक्ष्मण याचा विवाह मुखेड येथील टिमकेकर कुटुंबातील अश्विनी हिच्याशी आज मुखेड येथे होता. त्यासाठी तीन टेंपोद्वारे खरोसातील वऱ्हाडी निघाले होते. त्यातील एक टेंपो (आयशर- एमएच ३६ एफ ३५१९) सकाळी नऊच्या सुमारास जांब-शिरूर रस्त्यावरील कंधार पाटीजवळ येताच समोरून येणाऱ्या टॅंकरशी (एमएच ४ ईवाय ७७०) समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात दहा जण जागीच ठार झाले, तर २८ जण जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता, की टेंपोतील मृतदेह दोर लाऊन बाहेर काढावे लागले. जखमींपैकी १७ जणांना मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात, तिघांना अहमदपूरला तर आठ जणांना जळकोट (जि. लातूर) हून पुढे लातूरला हलविण्यात आले. मुखेडच्या रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. तिकडे लग्नघरी दुखाचे सावट पसरले. दरम्यान, अपघातग्रस्त टॅंकरवर पाठीमागून कार (एमएच २४ एएफ ४१५८) धडकली. त्यात कारचे काहीसे नुकसान झाले. 

जखमींची नावे
जखमींमध्ये मोहिनी सुधाकर चुबोकर, साधना प्रकाश कुंभार, कल्पना प्रकाश कुंभार, ताराबाई तावडे, शिवानी अमित नारंगे, सविता गणेश कुंभार, अस्मिता श्रीराम कुराडे, कोमल सोपान तेलंगे, प्रकाश लक्ष्मण कुंभार, चंद्रकला प्रकाश कुराडे, सुमन लोणीकर, पूजा अंकुश कुंभार, अंजली अंकुश कुंभार, अमृता दशरथ कुंभार, उषा अंकुश कुंभार, विठाबाई लक्ष्मण कुंभार आदींचा समावेश आहे.

मृतांची नावे 
रुक्‍मीणबाई गोरोबा राजे (वय ७०, निटूर, ता. निलंगा), शमा सत्ता तांबोळी (३८, खरोसा), कस्तुरबाई फुलबांगडीकर (६०, मुरूम, जि. लातूर), अरुणा शेषराव नारंगे (४५, लातूर), बाळू तिगलपल्ली (७०, वागदरी), भारतबाई शिवराम कुराडे (६५, ममदापूर), महानंदाबाई बोडके (४५, खरोसा), स्नेहा सुधीर कुराडे (१०, ममदापूर), सुमनबाई बाळू कुंभार (६५, वागदरी), तुकाराम बागले (३६, टेंपोचालक, मुरंबी  ( ता.चाकूर). 

Web Title: 10 dead in tempo tanker accident