परभणीतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी दहा लाखांचा निधी

गणेश पांडे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

परभणी : येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यांच्या सुशोभिकरणासाठी जिल्हा वार्षिक निधी मधून दहा लाख रुपयांचा निधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी मंगळवारी (ता.सात) आदेश दिले आहेत. 

परभणी येथील वसमत रस्त्यावर असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा व त्याचा परिसराचे सुशोभिकरण करावे अशी मागणी काही मराठा संघटनांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यानंतर मंगळवारी (ता.सात) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी परभणीच्या 

जिल्हाधिकाऱ्यांना या आदेशाचे पत्र दिले आहे. जिल्हा वार्षिक योजना 2018 - 19 अंतर्गत दहा लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात यावा असे  असे या पत्रात नमुद केले आहे. लवकरच या निधीतून छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे सुशोभिकरण केले जाईल असा विश्वास शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी व्यक्त केला आहे.
 
Web Title: 10 lakh given to Shivaji Maharaj Statue Renovation