एक रुपयात 10 लिटर गरम पाणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

उदगीर : उदगीर तालुक्‍यातील लोणी ग्रामपंचायतीच्या वतीने चौदाव्या वित्त आयोगातून सोलर सिस्टीमद्वारे गरम पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. गावात तीन ठिकाणी नागरिकांसाठी या गरम पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अवघ्या एक रुपयात दहा लिटर गरमागरम पाणी मिळत आहे. सध्या सर्वत्र असलेल्या थंडीच्या वातावरणात अत्यंत कमी दरात गरम पाणी अंघोळीसाठी मिळत असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. 

गरम पाण्याची सुविधा योजनेचे उद्‌घाटन करून लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी सरपंच माधव पाटील, ग्रामविकास अधिकारी सीताराम राठोड, उपसरपंच सोपान फड, सदस्य गणीसाब शेख, गणेश पटवारी, नरसिंग कांबळे, अशोक भुजबळे, पुरणदास उदासी, ज्ञानोबा लोणीकर, दिलीप गुलफुरे, तिरुपती सताळे, सतीश पाटील, वासुदेव केंद्रे, अनिल घुगे, संग्राम मुंडे, गणपत केंद्रे, दत्ता बिरादार, ज्ञानोबा गायकवाड उपस्थित होते. 

50 हजारांमध्ये कायमची सोय 
सोलरचे दोनशे लिटर पाण्याचे युनिट, कॉईन बॉक्‍स आणि पाण्याची टाकी तथा पाइप वगैरे साहित्य यासाठी केवळ पन्नास हजार रुपये खर्च आला आहे. कडाक्‍याच्या थंडीमध्ये चोवीस तास केव्हाही गरम पाणी नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे. 
- सीताराम राठोड, ग्रामविकास अधिकारी, लोणी 

सर्वत्र पडलेल्या या कडाक्‍याच्या थंडीत हवे तेव्हा गरम पाणी नागरिकांना मिळाले पाहिजे, या विचारातून ही संकल्पना राबविली आहे. वीज बिल आणि गॅस किंवा जळतण यांची बचतही होणार आहे. एकावेळी घेतलेल्या दहा लिटर गरम पाण्यात दोघेजण अंघोळ करू शकतात. 
- माधव पाटील, सरपंच, लोणी 

Web Title: 10 liter of hot water for rupees 1