अल्पवयीन युवतीवर बलात्कार, आरोपीस दहा वर्षांची शिक्षा

 प्रल्हाद कांबळे
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

नांदेड : लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन एका 15 वर्षीय युवतीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस ए सय्यद यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची आणि सहा हजार रुपये दंड अशी शिक्षा शुक्रवारी 14 नोव्हेंबरला सुनावली.                                          

नांदेड : लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन एका 15 वर्षीय युवतीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस ए सय्यद यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची आणि सहा हजार रुपये दंड अशी शिक्षा शुक्रवारी 14 नोव्हेंबरला सुनावली.                                          

हदगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे राहणारी एक पंधरा वर्षीय युवती आपल्या घरी काम करीत होती. यावेळी याच गावात राहणारा नराधम तरुण नितीन प्रकाश वाढवे (वय 21) हा दुचाकी घेऊन सदर तरुणीच्या घरी 23 सप्टेंबर 2015 रोजी दुपारी गेला. पीडित युवतीला आपल्या दुचाकीवर बसवून औरंगाबादला जाऊन लग्न करू असे आमिष दाखवून तिला नांदेडला आणले. नांदेडच्या रेल्वेस्थानकावर ती दुचाकीवरून उतरत असताना खाली पडली व जखमी झाली. यावेळी तिला तिथेच एका काम करणाऱ्या बाईसोबत सोडून तो पळून गेला. कशीबशी ही युवती हदगावला पोहोचली तिच्या फिर्यादीवरून हदगाव पोलीस ठाण्यात बलात्कार, अपहरण व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्यानंतर फौजदार दत्तात्रय वाघमारे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

न्यायाधीश सय्यद यांनी या प्रकरणात दहा साक्षीदार तपासले. जिल्हा सरकारी वकील संजय लाटकर यांनी पीडितेची बाजू भक्कमपणे मांडली. न्यायाधीश सय्यद यांनी आरोपी नितीन वाढवे याला दहा वर्षांची सक्तमजुरी व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Web Title: 10 years police custody for raped a girl