गुप्तधनप्रकरणी 11जणांना भोंदुबाबासह अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

जुन्या पैठण भागातील पालथीनगरी परिसरातील एका जुन्या दगडी चिरेबंदी वाड्यात गुप्तधन काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या भोंदुबाबासह एकुण 11 जणांना पैठण पोलिसांनी छापा टाकून पकडले. या घटनेत एक मुंबई, अकोलो येथील तीन मांत्रिकांनाही अटक करण्यात आली आहे. घटना रविवारी (ता.29) जुन्या पैठण मधील  काळा पहाड येथे सकाळी अकराला घडली.

पैठण (औरंगाबाद) :  जुन्या पैठण भागातील पालथीनगरी परिसरातील एका जुन्या दगडी चिरेबंदी वाड्यात गुप्तधन काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या भोंदुबाबासह एकुण 11 जणांना पैठण पोलिसांनी छापा टाकून पकडले. या घटनेत एक मुंबई, अकोलो येथील तीन मांत्रिकांनाही अटक करण्यात आली आहे. घटना रविवारी (ता.29) जुन्या पैठण मधील  काळा पहाड येथे सकाळी अकराला घडली.

गुप्तधन काढण्यासाठी वाड्यातील खोदकामाच्या या घटनेमुळे  शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विजयकुमार भाऊराव शिसोदे यांचा हा वाडा आहे.  पोलिसांनी सांगितले की, काळापहाड येथे हा जुना चिरेबंदी वाडा असुन या वाड्यात कोणीही  राहत नसल्याने बंद आहे. या वाड्यात गुप्तधन काढण्यासाठी अकरा लोक मांत्रिकासह गेले व तेथील वाड्यातील एका खोली मध्ये अठरा फुट खोलीचा एक मोठा खड्डा केला. त्या खड्याजवळ लिंबु व काही बिया आदी वस्तु, साहित्य पोलिसांना आढळुन आल्या आहेत.

पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सचिन सानप, रामकृष्ण सागडे यांनी ही कारवाई केली. या घटनेचा  पोलिस पंचनामा करीत आहे. दरम्यान, सदरील वाड्यात काल अमावस्येच्या दिवशी रात्री आजची तयारी करुन आज गुप्तधन काढण्यासाठी अकरा जणांनी वाड्यात प्रवेश केल्यानंतर लगेच पोलिस तेथे धडकले. त्यात प्रवीण भीमराव गवळी, विनायक शिवराम अहिरे,मुंबई  ज्ञानेश्वर खोडे, दत्ता सुधाकर साबळे(अकोला)  संजय केशव शिसोदे, विलास कैलास शिंदे, शिवाजी रामदास शिंदे, नारायण किसन फसाटे, अशोक सीताराम गोमले, अजय परदेशी या संशयितांना अटक करण्यात आली असुन  घटनास्थळी दोन दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. 

जादुटोणा कायद्यान्वये गुन्हा : देशमुख 
गुप्तधन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अकरा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.  त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र अधिनियम 2013 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट प्रथा व जादुटोणा या कायद्यानुसार संशयित अकरा आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 arrested in Superstition case in aurangabad district