हंगामी वसतिगृहात जेवणातून 11 विद्यार्थ्यांना विषबाधा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

पाटोदा - दासखेड (ता. पाटोदा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या ऊसतोड कामगार मजुरांच्या पाल्यांसाठी सुरू असलेल्या हंगामी वसतिगृहात 11 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी (ता. तीन) घडली आहे.

पाटोदा - दासखेड (ता. पाटोदा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या ऊसतोड कामगार मजुरांच्या पाल्यांसाठी सुरू असलेल्या हंगामी वसतिगृहात 11 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी (ता. तीन) घडली आहे.

दासखेड येथील हंगामी वसतिगृहात विद्यार्थ्यांनी दुपारी एक वाजता जेवण केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना उलट्या व पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यांना पाटोदा ग्रामीण रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आले. नंतर या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली. पाटोदा ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर डॉ. साजिया यांनी उपचार केले. यामध्ये सौरभ भंडारे, राजकन्या कोकाटे, अस्मिता कोकाटे, सारिका माने, धनराज शेलार, महेश कोकाटे, संगीता मखर, साक्षी भंडारे या विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. हे सर्व विद्यार्थी आठ ते दहा वयोगटातील आहेत. बहुतांशी ऊसतोड मजूर हे गावी परतले असले तरी हे हंगामी वसतिगृह अजून सुरू आहेत.

हलगर्जीपणातून घटना
विषबाधेचा प्रकार संबंधितांच्या हलगर्जीपणामुळे घडला असून तो दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाटोदा ग्रामीण रुग्णालयातही याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. तर शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क होऊ शकला नाही.

हा प्रकार विषबाधेचा नाही. येथील मुलांना चपात्या जेवणात देण्यात येतात. आज पहिल्यांदाच मुलांना बाजरीच्या भाकरी देण्यात आल्यामुळे कदाचित त्यांच्या पोटात दुखून मळमळ व उलट्यांचा त्रास झाला असावा. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
-धनंजय बोन्दार्डे, गटशिक्षण अधिकारी.

Web Title: 11 students food poisoned