औरंगाबाद : जिल्ह्यात अकरापर्यंत सरासरी 11.60 टक्के मतदान 

योगेश पायघन
Monday, 21 October 2019

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी काहीसा निरुत्साह दिसत असल्याने पहिल्या दोन तासांत सुमारे 6 टक्केच मतदान झाले. त्यानंतर मतदानाने वेग घेतल्याने काहीसा टक्का वाढला आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत 11.60 टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. 

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी काहीसा निरुत्साह दिसत असल्याने पहिल्या दोन तासांत सुमारे 6 टक्केच मतदान झाले. त्यानंतर मतदानाने वेग घेतल्याने काहीसा टक्का वाढला आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत 11.60 टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. 

Image may contain: 12 people, people standing

सिल्लोडमध्ये मतदानाची टक्केवारी सर्वात अधिक असुन सकाळी नऊपर्यंत 9.12 टक्के तर अकरापर्यंत ती आकडेवारी 14.5 वर पोहचली असुन जिल्हातील सर्वाधीक मतदानाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी मतदान गंगापुर मतदार संघात झाली आहे. सकाळी नऊपर्यंत 6.3 तर अकरा पर्यंत केवळ 11.01 टक्केच मतदान झाले. कन्नड विधानसभा मतदार संघात सकाळी नऊपर्यंत 6.57 तर अकरा पर्यंत 13.26 टक्के मतदान झाले. फुलंब्री मतदार संघात सकाळच्या फेरीत 6.51 तर दुसऱ्या फेरीत 13.72 टक्के मतदानाची नोंद झाली. 

Image may contain: 8 people, people smiling, people standing
महाआघडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी सपत्नीक पिसादेवी येथील शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात सकाळी नऊ पर्यंत 6.48 तर अकरा पर्यंत 14.22 टक्के मतदान झाले. औरंगाबाद पुर्व मतदार संघात सकाळी नऊ वाजता 8.5 तर दुसऱ्या फेरीत 13.1 टक्के मतदान झाले. औरंगाबाद पश्‍चिम मध्ये सकाळी सर्वात कमी म्हणजे 4.3 तर दुसऱ्या फेरीत मतदानाचा टक्का वाढल्याने अकरा वाजेपर्यंत 12.51 टक्के मतदानाची नोंद झाली.

Image may contain: 3 people, people smiling, people sitting and outdoor
अंधारी(ता.सिल्लोड ) येथे मतदान केंद्रावर मोठी रांग असल्याने मतदान केंद्राच्या बाहेर गप्पा मारतांना आजोबा..

पैठण मतदार संघात पहिल्या फेरीत 6.81 तर दुसऱ्या फेरीत 14.3 टक्के मतदान झाले. वैजापुरात सकाळी नऊ पर्यंत सात तर अकरा वाजेपर्यंत 11.2 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. ढगाळ वातावरण काहीसे निवळल्याने मतदार बाहेर पडत असल्याने मतदान केंद्रांवर रांगा लागायला सुरुवात झाली असल्याचे जिल्ह्यातील सकाळचे सत्र संपतानाचे चित्र आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11.60 % voting in aurangabad till 11.30am