लातूर: पंधरा वर्षांनंतर वाहिले पुलावरून पाणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 सप्टेंबर 2016

लातूर - गेल्या चार पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने जळकोट तालुक्यातील अतनूर येथील तेरु नदीच्या पुलावरून पंधरा वर्षांनंतर पाणी वाहत आहे. त्यामुळे भागातील नागरिकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली.

जळकोट तालुक्यातून वाहणारी तेरु नदी सततच्या पाऊसाने ओव्हरफ्लो झाल्याने मोठ्या प्रमाणात सांडवा चालु झाला असून, ही नदी तालुक्यातील मंगरूळकर, सोनवळा, एकगा, बोरगाव, तितुका, सुल्लाळी, अतनुर, गव्हाणमार्गे आंध्र प्रदेशात जाते. या नदीवरील अतनुर पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने रविवारी सुमारे सहा तास वाहतूक बंद करण्यात आली होती. आज सकाळपासून पुन्हा वाहतूक सुरुळीत झाली आहे.

तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनी ओलतीखाली यावी येथील शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती व्हावी या हेतुने माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तिरु नदीवर बॅरेज बसविण्याची घोषणा केली, तसा सर्वेही संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला होता. परंतू नंतरच्या काळात याकडे सरकारने पाठ फिरविल्याने आज पावसाळ्यात कित्येक लिटर पाणी आंध्रात वाहून जात आहे. त्यामुळे कितीही पाऊस झाला तरीही या भागातील पंधरा ते सोळा गावातील शेतकऱ्यांना या पाण्याचा कसलाही उपयोग होत नाही.