जीएसटीच्या अभियानातून केली 127 डिलरची नोंदणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

मोहिमेतंर्गत पहिल्या टप्प्यात वैजापूर, पैठण, गंगापूर, औरंगाबाद तालुका व शहरातील विविध भागात न्यायालय, मसीआ, प्रोझोन मॉल आदी ठिकाणी जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानात नागरिकांमध्ये व्यवसाय कर भरण्यासंदर्भात असलेला गैरसमज, अडचणी याची माहिती देण्यात आली. 

औरंगाबाद : राज्य व वस्तू सेवाकर कायदा लागू झाल्यानंतर व्यवसायकर भरण्याची काहीच गरज नाही असा गैरसमज व्यावसायिकांमध्ये निर्माण झाला होता. त्यामुळे अनेकांनी व्यवसाय कर भरणा केला नाही.

यासंदर्भात जनतेमध्ये असलेला संभ्रम करण्यासाठी जीएसटीच्या व्यवसाय कर विभागाच्यावतीने ता. 14 जानेवारी ते 8 फेब्रुवारीदरम्यान विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत 127 डिलरने स्वत: व्यवसायकर नोंदणी केली, अशी माहिती विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश शिंदे यांनी सोमवारी (ता. 11) दिली. 

मोहिमेतंर्गत पहिल्या टप्प्यात वैजापूर, पैठण, गंगापूर, औरंगाबाद तालुका व शहरातील विविध भागात न्यायालय, मसीआ, प्रोझोन मॉल आदी ठिकाणी जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानात नागरिकांमध्ये व्यवसाय कर भरण्यासंदर्भात असलेला गैरसमज, अडचणी याची माहिती देण्यात आली. 

जिल्ह्यात व्यवसायकर नोंदणी धारकांची (पीटीआरसी) संख्या सुमारे 10 हजारच्या वर असून व्यक्तिगत कर भरणा करणाऱ्यांची (पीटीईसी) संख्या जवळपास 25 हजारच्या घरात आहे. शासन आपल्या दारी उपक्रमानुसार व्यवसाय कर कायद्याचे अनुपालन सुनिश्‍चीत करण्यासाठी व्यवसाय जनजागृती अभियान राबविले जात आहे. व्यवसाय कर कायद्यांतर्गत नोंदणीकृत नसलेल्या व्यक्ती, कंपनी, प्रतिष्ठान मालकांनी नोंदणी करुन घ्यावी. यासाठी आम्ही सातत्याने शहरातील सीए. व्यवसायक कर सल्लागार यांना सुचना केल्या आहेत. ज्यांनी नोंदणी केली नाही त्यांनी तात्काळ नोंदणी करावी असे आवाहन जीएसटी व्यवसाय कर विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश शिंदे यांनी केले आहे.

Web Title: 127 Dealer Registration made by GST Campaign