लातूर - महापालिकेच्या कारभाराच्या विरोधात काँग्रेस नगरसेवकांचा कंदिल मोर्चा

हरी तुगावकर 
मंगळवार, 31 जुलै 2018

लातूर : लातूर शहर महानगर पालिकेत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व मनपाच्या रस्ते, पाणी, वीज विभागातील गलथान कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेस नगरसेवकांनी मंगळवारी (ता.31)  गांधी चौक ते महानगरपालिका असा कंदिल मोर्चा काढला. 

लातूर : लातूर शहर महानगर पालिकेत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व मनपाच्या रस्ते, पाणी, वीज विभागातील गलथान कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेस नगरसेवकांनी मंगळवारी (ता.31)  गांधी चौक ते महानगरपालिका असा कंदिल मोर्चा काढला. 

लातूरकरांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवत व भरमसाठ अश्वासने देवून सत्तेत आलेल्या भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी लातूरकरांना मुलभूत सुविधांपासूनही वंचित ठेवले आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी निवडणूकीत लातूरकरांना दररोज पाणीपूरवठा करु, वीजेची सोय करु व शहरातील खड्डेमुक्त रस्ते  यासह अनेक अश्वासने दिली होती परंतू सध्या लातूरकरांना मुलभूत सोयीसुविधाही उपलब्ध होत नाहीत. अनेक समस्यांना तोंड देत नागरिक हैराण झाले आहेत. मनपाच्या विविध विभागातील गलथान कारभारावर वेळीच आळा घालून  नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्या यासाठी काँग्रेस नगरसेवकांच्या वतीने कंदिल मोर्चा काढण्यात आला. माजी महापौर अॅड.दिपक सूळ यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात  नगरसेवक, नगरसेविकांनी घागर घेवून व दिवसा कंदिल पेटवून मनपातील गलथान कारभारावर प्रकाश टाकून सत्ताधायांच्या डोळयात अंजन टाकण्याचे काम केले. या मोर्चाची दखल घेवून सत्ताधारी आतातरी नागरिकांना किमान दोन दिवसातून एकदा पाणी पूरवठा करतील तसेच शहरातील रस्ते खड्डेमुक्त व प्रकाशमान करतील अशी आशा काँग्रेस नगरसेवकांनी व्यक्त केली. 

शहरातील गांधी चौक येथून काढण्यात आलेल्या मोर्चा मिनी मार्केट मुख्य रस्ता मार्गे महानगरपालिकेत नेण्यात  आला. मोर्चात सहभागी नगरसेकांनी हातात रिकाम्या घागरी, पेटविलेले कंदिल घेतले होते. उलटी हालगी वाजविण्यात आली. महापालिकेत मोर्चा आल्यानंतर मनपा आयुक्त कौस्तूभ दिवेगावकर यांच्या दालनात उपायुक्त वसुधा फड यांना निवेदन देण्यात आले.

या मोर्चात नगरसेवक पप्पू देशमुख, पुनित पाटील, संचिन बंडापल्ले, सचिन मस्के, युनुस मोमिन, विजय साबदे, कैलास कांबळे,व्यंकटेश पुरी, दत्ता सोमवंशी, हनिफ शेख, इम्राण सय्यद, नगरसेविका उषाताई कांबळे, हारुबाई बोईनवाड, कांचन अजनीकर, दिप्ती खंडागळे, मिनाताई लोखंडे, गौरबी बागवान,  गोरबा लोखंडे, आकाश भगत, अॅड.फारख शेख, अॅड.बोरुळे पाटील, सुमित खंडागळे, सलिम टाके, इम्राण गोंद्रीकर, राजीव गवळी, जय ढगे, जमालुद्दीन मणियार, मैनोद्दीन सौदागर, रमेश कांबळे आदीसह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.