टॅंकर-जीपच्या अपघातात 14 वऱ्हाडी गंभीर जखमी

Accident
Accident

सिल्लोड-पिशोर - सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील दिगाव फाट्याजवळ (ता. कन्नड) पाण्याचा टॅंकर व क्रुझर जीपमध्ये झालेल्या अपघातामध्ये जीपमधील 14 वऱ्हाडी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. 29) दुपारी एकच्या सुमारास घडली.

सिरसाळातांडा (ता. सिल्लोड) येथून कन्नड तालुक्‍यातील जैतखेडा तांडा येथे अजय भीमराव राठोड यांच्या लग्नासाठी वऱ्हाडी जात असताना जीप व पाण्याच्या टॅंकरची समोरासमोर धडक होऊन जीप पुलाखाली घसरत गेली.
या अपघातामध्ये सहा मुली, सहा पुरुष व दोन महिला गंभीर जखमी झाल्या. अपघातातील जखमींना तातडीने सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटीत पाठविण्यात आले.

दोन्ही वाहनांच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेमध्ये क्रुझर जीपचा चुराडा झाला. दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाखाली फरफटत गेली. अपघातामध्ये जीवितहानी झाली नसली, तरी चौदा वऱ्हाडी गंभीर जखमी झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com