नांदेडच्या डॉक्‍टरचे चौदा लाख पकडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

नांदेड : नांदेड येथील एक डॉक्‍टर आपल्या कुटुंबासह हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे दर्शनासाठी जात असताना रविवारी दुपारी वसमत नगरपालिका आचारसंहिता पथकाने त्यांची गाडी पकडली आणि त्यातून चौदा लाख रुपये जप्त केले. नगरपालिका आचारसंहिता पथकातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

केंद्र सरकारने पाचशे व एक हजाराच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्याने पैसा साठवून ठेवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. बॅंकेतून मोठी रक्कम काढता येईना व बॅंकेत भरताही येईना, यामुळे साठेबाज अडचणीत सापडले आहेत. नांदेडमधील एका महिला डॉक्‍टरकडून जवळपास एक कोटीचा ऐवज पोलिसांनी यापूर्वीच जप्त केला होता.

नांदेड येथील डॉ. मनीष कत्रुवार यांनी आपण नांदेडच्या बॅंकेतून चौदा लाख रुपये काढून घरी कोणीच नसल्याने ही रक्कम सोबत घेऊन औंढा येथे दर्शनासाठी आम्ही जात असल्याचे वसमत पोलिसांना सांगितले. मात्र, एवढी मोठी रक्कम दर्शनाला जाताना घेऊन जाण्याचा हा युक्तिवाद न पटणारा असल्याने आचारसंहिता पथकाने ही रक्कम जप्त केली.

Web Title: 14 lac siezed from a doctor in hingoli