esakal | परभणीत चौदा वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने लावले लग्न
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

परभणीत चौदा वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने लावले लग्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाथरी (परभणी): अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांच्या सहकार्याने २८ वर्षीय तरुणाने आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलीसोबत शेतात लपून लग्न केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मंगळवारी (ता.२०) पाथरी पोलिसांत नवरदेव, गुरुजीसह नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पाथरी तालुक्यातील मंजरथ येथील एका महिलेस दोन मुली व एक मुलगा आहे. गावातील किशोर सूळ या तरुणाने या महिलेकडे तगादा लावला होता. केवळ चौदा वर्षांच्या मोठ्या मुलीला त्याने मागणी घातली होती. यास त्या मुलीच्या मामाने नकार दिला होता.

दरम्यान मुलीचे मामा गावाला गेल्याचे पाहून ता.सहा जुलै रोजी मुलीच्या आई-वडिलांसह अन्य नातेवाइकांनी किशोर सूळ याच्यासोबत मुलीचे बानेगाव शिवारातील एका शेतात जबरदस्तीने लग्न लावून दिले. घटनेची माहिती मिळताच चाइल्डलाइनचे जिल्हा समन्वयक संदीप बेडसुरे व बाल सर्वेक्षण कक्षाचे मिलिंद साळवी यांनी सकाळी पाथरी पोलिसांना माहिती देऊन पोलिसांसह मंजरथ गाठले.

हेही वाचा: नांदेडमधील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले; महापालिकेचे दुर्लक्ष

पोलिसांनी या घटनेत रात्री उशिरा मुलीच्या मामाने दिलेल्या फिर्यादीवरून मुलीच्या आई-वडिलांसह नवरदेव किशोर सूळ त्याची आई कुशावर्ता सूळ, भडजी कालिदास रोडे यांच्यासह भास्कर सावंत, सखाराम अश्रोबा निर्गुने, सुभाष काळे व अरुणा सुभाष काळे यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

loading image