तुळजाभवानी चरणी 141 किलो सोने जमा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

तुळजापूर - तुळजाभवानी मातेला गेल्या नऊ वर्षांत भाविकांनी 141 किलो सोने, एक हजार 857 किलो चांदी अर्पण केली आहे.

तुळजापूर - तुळजाभवानी मातेला गेल्या नऊ वर्षांत भाविकांनी 141 किलो सोने, एक हजार 857 किलो चांदी अर्पण केली आहे.

देवस्थान समितीने 2009 ते 18 सप्टेंबर 2018 पर्यंत जमा झालेल्या सोने, चांदीच्या वस्तूंची मोजदाद केली. त्याबाबतची माहिती देवस्थानकडून देण्यात आली. भाविकांनी दिलेल्या भरभरून दानामुळे संस्थानच्या विविध बॅंकांत 146 कोटी 51 लाख 65 हजार 82 रुपयांच्या ठेवी जमा आहेत. यूटीआय रिलेजस स्किमखाली 31 कोटी 51 लाख 65 हजार रुपये गुंतविले आहेत. चालू खात्यावरही 10 कोटी रुपये आहेत.

तुळजाभवानी मंदिर समितीचे अधिकारी, लेखाधिकारी, उस्मानाबादच्या प्रशासनातील लेखाधिकारी यांच्या समक्ष ही मोजदाद झाली, असे सांगण्यात आले.

मंदिर समितीचे एका बॅंकेच्या मुंबईतील शाखेत गोल्ड डिपॉझीटपोटी 49 किलो 839 ग्रॅम सोने आहे. त्याचे व्याज मंदिर समितीकडे जमा होते. याशिवाय मंदिराची 422 किलो 92 ग्रॅम चांदी आहे. तुळजाभवानी मातेच्या विविध वस्तू 474 किलो 540 ग्रॅमच्या चांदीच्या आहेत. याशिवाय देवीचे प्राचीन दागिने वेगळेच आहेत.

तुळजाभवानी मातेस भाविकांनी अर्पण केलेल्या सोने-चांदीच्या वस्तूंची मोजदाद झाली आहे. पुढील कार्यवाहीसाठी आगामी काळात सरकार, रिझर्व्ह बॅंकेचे मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न आहे.
- चेतन गिराशे, उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त, तुळजाभवानी मंदिर समिती

Web Title: 141 Kilogram Gold in Tuljabhavani Temple