एकाच रात्री १४५ मिलिमीटर पाऊस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

इटकळ परिसरात यंदा प्रथमच ओढे, नाल्याला पाणी

इटकळ - इटकळसह परिसरात बुधवारी (ता. २०) सायंकाळी पाच ते गुरुवारी (ता. २१) सकाळी आठपर्यंत जोरदार पाऊस झाला. या पावसाने परिसरातील नदी, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. रात्रभर झालेल्या या पावसाची १४५ मिलिमीटर नोंद झाली. 

इटकळसह परिसरात बुधवारी सायंकाळी  पाचच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. रिमझिम स्वरूपात असलेला हा पाऊस दोन तास सुरू होता. सायंकाळी सातच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. हा पाऊस रात्रीपासून गुरुवारी सकाळी आठपर्यंत सुरू होता. 

रात्रभर कधी मध्यम, तर काही वेळा जोरदार पाऊस झाला. इटकळ महसूल मंडळात अवघ्या एकाच रात्रीत तब्बल १४५ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. गेल्या काही वर्षांत असा मोठा पाऊस झाला नसल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगत आहेत. या पावसाने यावर्षी प्रथमच ओढे, नाले खळखळून वाहिले. बुधवारी सायंकाळपर्यंत कोरड्या असलेल्या ओढे, नाल्यांतून गुरुवारी सकाळी या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. परिसरातील बाभळगाव, निलेगाव, खानापूर, काटगाव, आरळी या भागांतही रात्रभर पाऊस झाला. त्यामुळे विहिरी, कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होण्यासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Web Title: 145 millimeters of rain in one night