कत्तलीसाठी घेऊन नेणऱ्या १५ जनावरांची सुटका

दीपक सोळंके
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

भोकरदन (जि. जालना) : बेकायदेशीररीत्या कत्तलखान्यात जनावरे घेऊन जाणारे आयशर पोलिसांनी शुक्रवारी (ता.17) मध्यरात्रीनंतर पकडला. या वाहनात १५ जनावरे होती. या प्रकरणी सिल्लोड (जि.औरंगाबाद) येथील तीन आरोपींसह आठ लाखांचा मुद्देमाल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार  उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये हे स्वतः पथकासह तालुक्यातील अवैध धंद्याना लगाम लावण्यासाठी कारवाई करीत असतांना त्यांच्या पथकाला तालुक्यातील बोरगाव जहाँगीर पाटीवर आयशर( क्र. एम.एच.०४ डीएस-६१९१) हे वाहन बेकायदेशीर रीत्या जनावरे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या वाहनाची तपासणी केली असता त्यात १५ बैलांना कोंबून घेऊन जात असल्याचे आढळून आले. ही जनावरें लातूर जिल्ह्यात कत्तलखान्यात विकल्या जाणार होती अशी माहिती पोलिसांकडून मिळाली. या जनावरांची पोलिसांनी सुटका करून त्यांची शहरातील गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे.

या प्रकरणी प्राणी छळवणूक प्रतिबंधक कायदा २०१५ व मोटार वाहन कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे अशरफ शहा रज्जाक शाह रा.बोरगाव बाजार (ता.सिल्लोड), शेख समीर शेख शब्बीर , शेख आसेफ शेख मस्तान दोन्ही रा.सिल्लोड व बशीर चडडा रा.वरणगाव    (जिल्हा जळगाव) यांच्या विरुद्ध भोकरदन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बशीर चडा वगळता वरील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. सदरील कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्यासह पथकातील शेख आसेफ, रामेश्वर सिनकर, गणेश पायघन, समाधान जगताप, सागर देवकर चालक दुर्गेश राठोड यांनी पार पाडली.

Web Title: 15 animals released for slaughter