राजेंद्र जैनने केली दीड कोटीची फसवणूक 

राजेंद्र जैनने केली दीड कोटीची फसवणूक 

औरंगाबाद - वामन हरी पेठेंच्या पासष्ट किलो सोनेचोरीचे प्रकरण उघड झाल्यानंतर आता संशयित राजेंद्र जैन याने बांधकाम व्यावसायिकाची एक कोटी 47 लाखांची फसवणूक केल्याची बाब समोर आली. या प्रकरणात त्याच्याविरुद्ध सोमवारी (ता. 22) क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली, असे सूत्रांनी सांगितले. 

वामन हरी पेठे ज्वेलर्स यांच्या 65 किलो सोने चोरी प्रकरणी राजेंद्र जैन तुरुंगाची हवा खात आहे. त्याने जडगाववाला ज्वेलर्सला दागिने विकल्याची तसेच काही पैशांतून मालमत्ता घेतल्याची बाब उघड झाली. याचदरम्यान त्याने जयभवानीनगर येथील बांधकाम व्यावसायिक स्वप्नील बळिराम खंदारे यांची फसवणूक केल्याची बाब समोर आली. वामन हरी पेठे प्रकरणात राजेंद्र जैन याचे नाव समोर आल्यानंतर स्वप्नील खंदारे यांनी आर्थिक गुन्हे शाखेत धाव घेतली व जैनने फसवणूक केल्याची तक्रार दिली. त्यानुसार, ऑगस्ट 2018 मध्ये जैन व खंदारे यांची भेट झाली. आपला कपड्यांचा मोठा व्यवसाय असल्याचे त्याने सांगितले. विश्‍वास बसावा म्हणून जैन याने त्याच्या व्यावसायिक बाबी दाखविल्या. गुजरातेत एक कारखाना उभारत असल्याचे सांगून यात भागीदारीसाठी त्याने खंदारे यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला. जैनवर विश्‍वास ठेवून भागीदारीची रक्कम नोव्हेंबर व डिसेंबर 2018 मध्ये खंदारे यांनी जैनला आरटीजीएस पद्धतीने दिली; परंतु त्यानंतर चार महिने उलटूनही परतावा व मूळ रक्कम त्याने परत केली नाही. जैनचे फसवणुकीचे कारनामे समोर आल्यानंतर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले, सहायक पोलिस निरीक्षक सुभाष खंडागळे, पोलिस हवालदार कारभारी गाडेकर, गणेश शिंदे यांनी चौकशी केली. त्यात फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com