बस-टँकरची धडक 15 प्रवाशी जखमी

उमेश वाघमारे
सोमवार, 9 जुलै 2018

जालना - जाफराबाद तालुक्यातील वाळसा वडाळा फाट्या जवळ सोमवारी (ता.नऊ) सकाळी बुलढाणा-औरंगाबाद या बसची आणि टँकरची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये 15 प्रवाशी जखमी झाले. तर तीन प्रवाशांची प्रकृति गंभीर आहे. 

बुलढाणा-औरंगाबाद ही बस 41 प्रवाशी घेऊन औरंगाबादकडे निघाली होती. यावेळी बुलढाणाकडे निघलेला टँकर (क्र. एम एच 04, जी एफ 5301) आणि या बसची जाफराबाद तालुक्यातील वाळसा वडाळा फाट्यावर समोरासमोर जोराची धडक झाली. 

जखमी प्रवाशांना भोकरदन, महोरा येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, चालकासह दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद घाटी रुग्नालयात हलवण्यात आले आहे.

Web Title: 15 passengers injured in bus-tanker accident