मराठवाड्यात दीड हजार कोटींचे होणार कर संकलन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

औरंगाबाद - नोटाबंदीनंतर कर भरणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कर चोरी करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागातर्फे कारवाई होत असल्यानेही कर भरणाऱ्यांचा आकडा वाढत आहे. मराठवाड्यात फेब्रुवारीपर्यंत सव्वा लाख करदाते वाढले आहेत; तर औरंगाबाद विभागात दीड हजार कोटींचे कर संकलन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने दिली. 

प्राप्तिकर विभागातर्फे करदाते वाढविण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. दरम्यान, कर चोरी करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभाग करडी नजर ठेवून आहे. करवाढीसाठी प्राप्तिकर विभागातर्फे मराठवाड्यात सेंट्रल ऍक्‍शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. अग्रिम कर, थेट कर भरणा व टीडीएस कर भरणा करणाऱ्यांची संख्या वाढविण्यावर विभागाच भर आहे. या ऍक्‍शन प्लॅनच्या माध्यमातून तीन महिन्यांपासून मराठवाड्यातील जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत आहे. यामुळेच करदात्यांची संख्या वाढल्याचे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: 1.5 thousand crore in Marathwada tax collection