जिल्ह्यात दीड हजारावर शाळा झाल्या प्रगत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

औरंगाबाद - ग्रामीण भागातील गुणवत्तेला वाव देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. गेल्या महिन्यात स्वतंत्र यंत्रणेमार्फत या शाळांची गुणवत्ता तपासून घेतली होती. त्यातही या शाळा अव्वलस्थानी होत्या. जिल्ह्यातील 2 हजार 76 शाळांपैकी 1 हजार 501 शाळा प्रगत झाल्या आहेत. तर जिल्ह्यातील 74 शाळांनी शंभर टक्‍के प्रगती करून "सुपर क्‍लास' श्रेणी मिळवली आहे. 

शाळा प्रगत करण्यासाठी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करत उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. गणित व भाषा विषयांची शंभर टक्के अपेक्षापूर्ती विद्यार्थ्यांकडून झाली. यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांचा महत्वाचा सहभाग होता. त्यात 74 शाळांनी शंभरपैकी शंभर गुण संपादन केले. 

खरेच या शाळा गुणवत्तेला पात्र आहेत का याची मार्चमध्ये तपासणी करण्यात आली होती. प्रत्येक तालुक्‍यात स्वतंत्र पथके नेमून विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. त्यात काही ठिकाणी तीन टक्के फरक आल्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांनी सांगितले. 

तालुकानिहाय सुपर क्‍लास शाळा 
वैजापूर : 24 
सिल्लोड : 18 
औरंगाबाद : 12 
पैठण : 5 
फुलंब्री : 5 
गंगापूर : 4 
कन्नड : 4 
खुलताबाद : 1 
सोयगाव : 1 

Web Title: 1.5 thousand school progressed in the aurangabad district