चाकुचा धाक दाखवून 15 हजाराची चोरी

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 17 जून 2019

नांदेड : रस्ता अडवून चाकुचा धाक दाखवून अनोळखी तिघांनी दुचाकीस्वाराला लुटले. चाकु पोटाला लावून एक मोबाईल व नगदी अडीच हजार असा पंधरा हजाराचा ऐवज जबरीने चोरून नेला. ही घटना सांदीपनी शाळेसमोर रविवारी (ता. 9) रात्री घडली. याप्रकरणी सोमवारी (ता. 17) गुन्हा दाखल झाला. 

मुदखेड येथील शिवाजीनगर भागात राहणारेा विद्यार्थी विष्णु प्रल्हाद गायकवाड (वय 28) हा आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून शंकरराव चौक मार्गे गाडेगाव ते मुदखेड जात होते. त्यांची दुचाकी सांदीपनी शाळेसमोर जाताच एका दुचाकीवरुन आलेल्या अनोळखी तिघांनी त्यांना रात्री दहाच्या सुमारास अडविले. सर्वप्रथम मारहाण केली. तसेच त्या तिघांपैकी एकाने चाकु पोटाला लावून विष्णु गायकवाड याचा आॅनर फाय कंपनीचा १२ हजार रुपये किंमतीचा मोबाईल व रोख दोन हजार 560 असा 15 हजाराचा एेवज जबरीने चोरुन नेला. भयभीत झालेल्या या विद्यार्थ्यांने घरच्या मंडळीचा विचार घेऊन सोमवारी (ता. 17) विमानतळ पोलिस ठाण्यात जबरी चोरीची तक्रार दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार नाईक हे करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 thousand stoles at Nanded