लातूरमध्ये राष्ट्रभक्तीचा गजर!

लातूर - जिल्हा क्रीडा संकुलात राष्ट्रध्वज उभारणी सोहळा शुक्रवारी झाला. या सोहळ्याला साडेअकरा हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. याचे ‘ड्रोन’च्या साह्याने टिपलेले विहंगम दृश्‍य.
लातूर - जिल्हा क्रीडा संकुलात राष्ट्रध्वज उभारणी सोहळा शुक्रवारी झाला. या सोहळ्याला साडेअकरा हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. याचे ‘ड्रोन’च्या साह्याने टिपलेले विहंगम दृश्‍य.

लातूर - तरुणांत राष्ट्रभक्तीची भावना जागृत ठेवण्याच्या उद्देशाने येथील जिल्हा क्रीडा संकुलात उभारलेल्या १५० फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाचे शुक्रवारी शानदार लोकार्पण झाले. साडेअकरा हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सादर झालेल्या देशभक्तीपर गीताने वातावरण प्रफुल्लित झाले. ‘आपला राष्ट्रध्वज, आपला सन्मान’ असा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून या राष्ट्रध्वज उभारणीचे काम सुरू होते. त्यासाठी क्रीडा व युवक संचालनालय, जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीने पुढाकार घेतला होता. ७१ लाख रुपये खर्च करून या राष्ट्रध्वजाची उभारणी करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे लोकार्पण झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com