हिंगोली जिल्ह्यात सोळा मंडळात अतिवृष्टी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

हिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासांमध्ये दोन हजार पाऊस झाला असून 30 पैकी तब्बल सोळा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामुळे नदी-नाले वसंत वाहू लागले असून सखल भागातील शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

हिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासांमध्ये दोन हजार पाऊस झाला असून 30 पैकी तब्बल सोळा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामुळे नदी-नाले वसंत वाहू लागले असून सखल भागातील शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये बुधवारपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. गुरुवारी (ता. 16) पावसाने चांगलाच जोर पकडला दिवसाच्या उघडीपी नंतर सुरू असलेल्या धुवाधार पावसाने नदी-नाले भरून गेले होते. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले तरी सखल भागातील शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. शेतातील पाणी काढून देण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. कळमनुरी तालुक्यातील करवाडी या गावाला जाणारा कच्चा रस्ता पाण्याने भरून गेला आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून दिवसापासून करवाडीकर गावाबाहेरच निघाले नाही. या गावकऱ्यांनी आता रस्त्यासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात गुरुवारी (ता. 16) रात्री गावकऱ्यांची बैठकही झाली आहे.

दरम्यान जिल्ह्यातील 30 मंडळांपैकी 16 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून यामध्ये हिंगोली मंडळात 68 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सिरसम मंडळात 90, बासंबा 68, कळमनुरी 89, नांदापूर 92, आखाडा बाळापुर 93, डोंगरकडा 95, वारंगा 85, वाकोडी 76, वसमत 75, आंबा 80, हयातनगर 87, औंढा नागनाथ 105, जवळाबाजार 70, साळणा 76, तर कुरुंदा मंडळांमध्ये 85 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सरासरीच्या 62 टक्के पाऊस पडला आहे. मागील वर्षी या वेळेपर्यंत सरासरीच्या 35 टक्के पाऊस झाला होता. दरम्यान अद्यापही पावसाळी वातावरण कायम असून मोठा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नदी व नाल्याकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Web Title: 16 mandals from hingoli have heavy rain