परप्रांतात जाणारे 17 लाखांचे गोमांस जप्त ; भोकर पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

विनापरवानगी व बंदी घातलेेले जवळपास 17 लाख 31 हजारांचे गोमांस आढळून आले. अमरावती येथून विनापरवानगी गोवंशांची कत्तल करून हे कर्नाटक राज्यात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे ट्रक चालकांनी सांगितले.

नांदेड : परप्रांतात जाणारे व राज्यात बंदी असलेले 17 लाखांचे 8 टन गोमांस भोकर पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई भोकर येथील शासकीय विश्रामगृहासमोर शुक्रवारी (ता.22) करण्यात आली. यावेळी पोलिसांनी ट्रक जप्त करून तिघांना अटक केली असून, सर्व गोमांसाची विल्हेवाट लावली आहे. 

2015 मध्ये राज्य सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला. परंतु या कायद्याचीच हत्या केल्या जात असल्याचे दिसून येते. अमरावती येथून ट्रक क्रमांक एमएच३४-एबी-०३३५ मध्ये आठ हजार ६५५ किलोग्राम वजनाचे गोमांस भरून कर्नाटक राज्यात जात असल्याची गुप्त माहिती भोकर उपविभागीय पोलिस अधिकारी अभय देशपांडे यांना मिळाली. भोकरमार्गे येणाऱ्या ट्रकवर पाळत ठेवत त्यांनी एक पथक स्थापन केले. वरील क्रमांकाचा ट्रक भोकर विश्रामगृहासमोर येताच त्याला थांबविले.

विनापरवानगी व बंदी घातलेेले जवळपास 17 लाख 31 हजारांचे गोमांस आढळून आले. अमरावती येथून विनापरवानगी गोवंशांची कत्तल करून हे कर्नाटक राज्यात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे ट्रक चालकांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी ट्रकचालक महमद अर्शद अब्दुल नजीरखान, शख अबू शेख अनिस आणि नजर परवेज खान तिघे राहणार अमरावती यांना अटक केली. 

पोलिस कर्मचारी माधव पाटील यांच्या फिर्यादीवरुन भोकर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक एस. यू. सय्यद हे करीत आहेत. पशुवैद्यकिय अधिकाऱ्यास बोलावून घेऊन पंचनामा केला. जप्त केलेले गोमांस भोकर परिसरात गाडून टाकून विल्हेवाट लावली आहे. 

Web Title: 17 lakhs of beef seized in the province action by Bhokar police