लातूर जिल्ह्यातील 175 अनफिट स्कूल बसचे परवाने "आरटीओ'कडून रद्द

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपली असतानाही बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या तब्बल 175 स्कूल बसवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई केली आहे. संबंधित वाहनाचे परवाने निलंबित करण्यात आले असून, ही वाहने पुन्हा रस्त्यावर आली तर आणि ज्या स्कूलब सनी अद्याप योग्यता प्रमाणपत्र घेतले नाही, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे. 

लातूर: योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपली असतानाही बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या तब्बल 175 स्कूल बसवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई केली आहे. संबंधित वाहनाचे परवाने निलंबित करण्यात आले असून, ही वाहने पुन्हा रस्त्यावर आली तर आणि ज्या स्कूलब सनी अद्याप योग्यता प्रमाणपत्र घेतले नाही, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे. 
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन मोटार वाहन कायदा 1988 कलम 86 अन्वये स्कूल बसवर ही कारवाई करण्यात आली. ज्या स्कूल बसवर कारवाई करण्यात आली आहे, त्यांनी तातडीने योग्यता प्रमाणपत्र घेतले तरच त्यांचा परवाना पुनर्स्थापित करण्यात येईल. त्याशिवाय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू ठेवली तर स्कूल बसवर कारवाईचे पाऊल उचलले जाईल, अशा सूचना प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांनी दिल्या. 
शाळेत येणारे विद्यार्थी हे परवाना नसलेल्या, वाहनाची योग्यता प्रमाणपत्र वैध नसलेल्या वाहनातून येत असतील तर अशा वाहनांना शाळेत येण्यापासून शाळाचालकांनी रोखावे. शिवाय, अशा वाहनांची माहिती आरटीओला कळवावी, असे आवाहन शाळांना करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यात 900हून अधिक स्कूल बस, स्कूल व्हॅन आहेत. यातील आणि परवाना नसलेल्या अनेक वाहनांकडे योग्यता प्रमाणपत्र नाही. त्यामुळे अशा वाहनांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी शाळांवर सोपविण्यात आली. त्यामुळे आता किती शाळा बेकायदेशीरपणे चालणाऱ्या स्कूल बसची आणि इतर वाहनांची माहिती कळवितात, याची उत्सुकता आहे. 

याकडे द्या लक्ष 
लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा प्रशासनाने आपल्या शाळेत येणाऱ्या स्कूल बसची सर्व कागदपत्रे तपासावीत. वाहनांचा परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, विमाप्रमाणपत्र, वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, वाहनचालकाचे वाहन चालविण्याचे प्रमाणपत्र यांची पडताळणी करावी. स्कूल बसमध्ये अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटी, मुलींसाठी महिला मदतनीस या सुविधा हव्यात. बेकायदेशीर वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सर्व शाळांतील परिवहन समितीवर आहे, असेही आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 175 Unfit School Bus Licenses canceled by RTO in district