शेतकरी कामगार पक्षाचे एक ऑगस्टपासून 17 वे अधिवेशन 

shetkari kamgar party
shetkari kamgar party

औरंगाबाद : भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) 1 ते 2 ऑगस्ट रोजी औरंगाबादेतील कर्णपुरा मैदानावर 17 वे अधिवेशन होणार आहे.

अधिवेशनाच्या उद्‌घाटनप्रसंगी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मार्क्‍सवादी पक्षाचे सिताराम येचूरी, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव, राजदचे तेजस्वी यादव यांच्यासह इतर पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती असणार आहे. ही माहिती शेकापचे जिल्हा चिटणीस विकासकाका शिंदे यांनी बुधवारी (ता. 25) पत्रकार परिषदेत दिली. 

अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी शेकापचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख असतील. अधिवेशनात विधानसभेच्या निवडणूकपुर्वीची राज्यातील समविचारी पक्षांची ऐक्‍याची भूमिका यावर मंथन होणार आहे. समारोपाप्रसंगी विविध राजकीय ठराव पारित करण्यात येणार असून मराठवाड्यावर आजवर झालेल्या अनुशेषासंदर्भात अन्यायावर व्यापक चर्चा होणार असून यातून राजकीय ठराव पारित करण्यात येणार असल्याचेही भाई विकास शिंदे यांनी सांगितले.

अधिवेशनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून 10 हजारावर व्यक्ती सहभागी होणार असून सात मंगलकार्यालयात साधारण सहा हजारावर व्यक्तींची रहाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी स्वतंत्र एक मंगलकार्यालय असल्याचे शिंदे म्हणाले. अधिवेशनासाठी सरचिटणीस आमदार जयंत पाटील, एन. डी. पाटील, विवेक पाटील, मिनाक्षी पाटील, धैर्यशिल पाटील आदि मान्यवर मार्गदर्शन करतील. मराठा आंदोलनाबाबत बोलताना शेकापचा मराठा आरक्षणास पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला तालूका चिटणीस निवृत्ती गायकवाड, गणेश सोनवणे, चंद्रकांत सरोदे, युनूस पठाण, नारायण घाईट, अंजन साळवे, ऍड. भाई सरवदे, महेश गुजर यांची उपस्थिती होती. 

संभाजी ब्रिगेडचे गायकवाड होणार सहसचिव 
संभाजी ब्रिगेडचे प्रविणदादा गायकवाड यांनी नुकताच पुण्यातील शनिवारवाडा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात शेकापमध्ये प्रवेश केला असून अधिवेशनादरम्यान त्यांना सहसचिव पद देण्यात येणार आहे. त्यांच्याकडे एका विभागाचा कार्यभार सोपविण्यात येणार आहे. अधिवेशन हे समविचारी पक्षाचे आहे, मात्र मनसे हा पक्ष जातीवाद, प्रांतवाद, भाषावाद करणारा असून अशा पक्षांना सोबत घेणार असल्याची भुमिकाही भाई शिंदे यांनी स्पष्ट केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com