COVID-19 : जालन्यात १८ नवे रुग्ण, आतापर्यंत ३३६ जण झाले बरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

लॉकडाउन शिथिल केल्यानंतर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढत आहे. गेल्या आठवड्यापासून जालना शहरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असतानाही शहराशी गाफील राहत आहेत.

जालना - शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी (ता. २८) ४३ रुग्णांची भर पडल्यानंतर सोमवारी (ता. २९) सकाळी १८ जणांच्या कोविड-१९ चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापैकी १३ रुग्ण हे जालना शहरातील विविध भागांतील आहेत. दरम्यान, आतापर्यंत ३३६ रुग्ण बरे झाले असून, सध्या १७२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

लॉकडाउन शिथिल केल्यानंतर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढत आहे. गेल्या आठवड्यापासून जालना शहरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असतानाही शहराशी गाफील राहत आहेत. बाजारेपेठेत सुरक्षित अंतराचे पालन होत नसल्याने चित्र आहे. रविवारी जिल्ह्यातील ४३ संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात ४० रुग्ण हे जालना शहरातील विविध भागांतील होते. तर सोमवारी पुन्हा १६ जणांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

मुंबईतील 'या' भागातील मृत्यूदर जगाच्या दुप्पट तर देशाच्या तीप्पट...

या रुग्णांमध्ये ११ जण शहरातील असून, यामध्ये ढवळेश्‍वर, जागडानगर, मंठा चौफुली परिसर, गोपाळपुरा, बन्सीपुरा, आरपी रोड, मिशन हॉस्पिटल, नवीन जालना परिसरातील खडकपुरा आणि दानाबाजार येथील प्रत्येकी एक व बरवार गल्ली व  मोदीखाना भागातील प्रत्येकी दोन व्यक्तींचा समावेश आहे. उर्वरित पाच रुग्णांमध्ये बदनापूर शहरातील कैलासनगरमधील एक, घनसावंगी तालुक्यातील मानेपुरी येथील एक, परतूर येथील  व जाफराबाद शहरातील एक व औरंगाबाद शहरातील पडेगाव येथील एकाचा समावेश आहे. 
 
जालना कोरोना मीटर

  • एकूण बाधित - 523
  • बरे झालेले - 336
  • उपचार सुरू - 174
  • मृत्यू - 13

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 18 new COVID-19 cases in Jalna dist