औरंगाबाद विभागात १८ हजार नवे करदाते 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जुलै 2019

जीएसटी आल्यानंतर राज्यात करदात्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. यात औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांत १८ हजार १३९ नवीन करदात्यांची भर पडली आहे. 

औरंगाबाद - जीएसटी आल्यानंतर राज्यात करदात्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. यात औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांत १८ हजार १३९ नवीन करदात्यांची भर पडली आहे. 

कर संकलनात औरंगाबाद विभाग राज्यात पहिल्या पाचमध्ये असून, गेल्या वर्षी तिन्ही जिल्ह्यांत दोन हजार २४८ कोटींचा महसूल मिळाला होता. यंदा दिलेले उद्दिष्टही पूर्ण झाले आहे. राज्य जीएसटीच्या व्यवसाय कर विभागाने १४ जानेवारी ते ८ फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहीम राबविली. यात सुमारे १२७ डीलर नव्याने जोडले गेले आहेत. दरम्यान, जीएसटी लागू झाल्यानंतर टॅक्‍स बुडविणाऱ्यांची संख्या घटली असून, व्यवहारातही पारदर्शकता आली आहे. राज्यात जीएसटी नोंदणी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 18 thousand new taxpayers in Aurangabad division