लातुरात बसणार १८ हजार एलईडी पथदिवे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

लातूर - राज्य शासनाच्या ऊर्जा संवर्धन धोरण २०१७ नुसार सर्व नागरी स्वराज्य संस्थांना एलईडी पथदिवे बसवणे बंधनकारक केलेले आहे.

त्याअनुषंगाने सर्व नागरी स्थानिक स्वराज्य क्षेत्रात केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रम असलेल्या एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेडच्या (ईईएसएल) माध्यमातून ईस्को तत्त्वावर एलईडी पथदिवे बसविण्यासाठी या कंपनीशी महापालिकेने करारही केला आहे. त्याअंतर्गत आता लातूर शहरात १८ हजार एलईडी पथदिवे बसविले जाणार आहेत. पुढील सात वर्षे ही कंपनी देखभाल दुरुस्तीही करणार आहे. यामुळे महापालिकेच्या विजेच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. 

सध्या महापालिकेच्या हद्दीमध्ये महावितरण कंपनीचे खांब, महापालिकेचे ट्युबलर खांबावरील पारंपरिक पध्दतीचे सर्व ट्युब सेट, मर्क्‍युरी सेट, दोन बाय चोवीस, चार बाय चोवीस, सीएफएल, सोडियम, मेटालाईट असे एकूण १४ हजार ८१४ पथदिवे आहेत, तसेच तीन हजार खांबांवर अद्याप दिवेच बसवले नाहीत. ते रिकामे आहेत. असे एकूण १८ हजार पथदिवे आहेत. हे पथदिवे सतत बंद राहत असल्याने नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. साहित्य खरेदी, देखभाल दुरुस्ती याशिवाय मासिक वीज देयके यावर होणारा खर्चही मोठा आहे. हा खर्च टाळता येत नसला तरी बचत करणे हा एक पर्याय आहे. ईईएसएल कंपनीशी करण्यात आलेला करार हा खंडित प्रदाने (डिफर्ड) या पध्दतीने राबविण्यात येणार आहे. नवीन एलईडी पथदिवे बसविणे व अनुषंगिक कामाचा सर्व भांडवली खर्च कंपनी करणार आहे. या खर्चाचा मासिक परतावा पद्धतीने ऊर्जा बचतीच्या प्रमाणात (ईस्को तत्वावर) महापालिका कंपनीला देणार आहे. त्यामुळे महापालिकेस कसलाही भांडवली खर्च करावा लागणार नाही. कंपनीकडून शहरातील पथदिव्यांचा सर्व्हे करून जुने पथदिवे बदलून त्या ठिकाणी नवीन अत्याधुनिक ऑपरेटिंग सिस्टीमसह ऊर्जा बचतीचे एलईडी पथदिवे बसविले जाणार आहेत. येत्या तीन ते चार महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. एलईडी पथदिवे बसविल्यानंतर सात वर्षे देखभाल दुरुस्ती कंपनी करणार आहे. यामुळे महापालिकेच्या खर्चात मोठी बचत होण्यास मदत होणार आहे.

Web Title: 18000 LED Street Light