घरफोड्याकडून रिव्हॉल्व्हरसह 19 काडतुसे जप्त 

घरफोड्याकडून रिव्हॉल्व्हरसह 19 काडतुसे जप्त 

औरंगाबाद - जालना येथे ता. 11 सप्टेंबरला भरदिवसा घरफोडी करणाऱ्या एका संशयितास जालना स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील सिल्लोड टी पॉइंट येथून शुक्रवारी (ता. दोन) रात्री ताब्यात घेतले. स्वप्नील रमेश कुलकर्णी ऊर्फ मोगली असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून रिव्हॉल्व्हरसह 19 काडतुसे जप्त केली आहेत. 

जालना येथील सोनलनगर परिसरात गणेश भवर यांच्या घरी चोरी झाली होती. यात रोख एक लाख 60 रुपये, आठ तोळे सोने, एक रिव्हॉल्व्हरसह जिवंत राऊंड असा एकूण चार लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला होता. प्रकरणातील एका संशयिताविषयी जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एक पथक औरंगाबाद येथे पाठविले. 

या पथकाने औरंगाबाद शहरातील सिल्लोड टी पॉइंट येथून स्वप्नील कुलकर्णी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून भवर यांच्या घरातून चोरलेल्या रिव्हॉल्व्हरसह 19 काडतुसे जप्त केली आहेत. दरम्यान, या प्रकरणी अजून एक संशयित असून त्याचा पोलिस तपास करीत आहेत. जालना एलसीबीच्या पथकाने उस्मानपुरा पोलिस ठाण्यात नोंद करून मोगलीला जालन्याला नेले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com