भ्रष्टाचारप्रकरणी अटकेतील माजलगावच्या नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव,  १९ नगरसेवक विरोधात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

 भ्रष्टाचारप्रकरणी मागील दोन महिन्यांपासून श्री. चाउस हे न्यायालयीन कोठडीत असल्याने शहरवासीय मुलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे शासनाची व जनतेची फसवणूक झाली असल्याचा आरोप करत चाऊस यांच्यावर अविश्वास ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आला आहे.

माजलगाव (जि. बीड) -  येथील नगर पालिकेतील भ्रष्टाचारासह इतर कारणास्तव नगराध्यक्ष सहाल चाउस यांचेवर अविश्वास ठराव बुधवारी (ता. २७) जिल्हाधिका-यांकडे दाखल केला असुन दिलेल्या निवेदनावर १९ नगरसेवकांच्या स्वाक्ष-या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, नगराध्यक्ष सहाल चाउस हे सतत हुकूमशाही मनमानी कामकाज चालवत, सर्वसाधारण सभा वेळेवर न घेता नियमबाह्य काम केले, शासनाच्या प्राप्त निधी अखर्चित ठेवून जनतेची फसवणूक केली.

 भ्रष्टाचारप्रकरणी मागील दोन महिन्यांपासून श्री. चाउस हे न्यायालयीन कोठडीत असल्याने शहरवासीय मुलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे शासनाची व जनतेची फसवणूक झाली असल्याचा आरोप करत चाऊस यांच्यावर अविश्वास ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आला आहे. या ठरावावर रोहन घाडगे, मंजूर शेख, भागवत भोसले, राहुल लंगडे, सुदामती पौळ, सुजाता शिंदे, सीमा होके, विनायक रत्नपारखी, रेश्मा मेंडके, सुमन मुंडे, अंजली होके, स्वाती डोंगरे, अशोक आळणे, राजश्री मुंदडा, शरद यादव, प्रताप लाटे, कमलबाई शिंदे, उषा बनसोडे, हानिफाबी शेख या नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, भाजपच्या पाठिंब्यावर सहाल चाऊस आघाडीच्या माध्यमातून विजयी झाले होते. पालिकेतील निधीच्या भ्रष्टाचार प्रकरणी अटक झालेले चाऊस सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 19 councilors against the mayor of Majalgaon

Tags
टॉपिकस
Topic Tags: