समाजासाठी झटणाऱ्यांच्या सदैव पाठीशी - प्रतापराव पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

औरंगाबाद - समाजात सकारात्मक बदल घडवायचे असतील तर त्यात प्रत्येकाचा सहभाग असणे गरजेचे आहे. अशा समाजासाठी झटणाऱ्या व्यक्ती, संस्थांच्या आम्ही सदैव पाठीशी आहोत, असे ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी आज सांगितले. ‘सकाळ’च्या मराठवाडा आवृत्तीच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त आज कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार पवार यांच्या हस्ते झाला. 

पवार म्हणाले, ‘समाजात जेव्हा एकत्रितपणे बदल घडविण्यासाठी प्रयत्न केले जातात तेव्हा आशावाद निर्माण होऊन चांगले काही घडू शकते. यासाठी झटणाऱ्या व्यक्ती, संस्थांच्या आम्ही सदैव पाठीशी आहोत. टीका करण्याऐवजी प्रश्‍न सोडविण्यावर नेहमीच आमचा भर राहिला आहे. ‘तनिष्का’, ‘यिन’च्या माध्यमातून महिला, विद्यार्थी, शेती, शिक्षण, शेतकरी, तरुण आदींनी वर्षाचे ३६५ दिवस, चोवीस तास उत्तेजन देण्याचे काम ‘सकाळ माध्यम समूह’ करीत आहे.’ सकाळ रिलीफ फंड, सरपंच परिषद, तनिष्का या माध्यमातून होत असलेल्या विविध कामांचीही त्यांनी माहिती दिली. या वेळी ‘सकाळ’चे संचालक- संपादक श्रीराम पवार, मराठवाडा आवृत्तीचे संपादक संजय वरकड, सरव्यवस्थापक रमेश बोडके उपस्थित होते.

महिलांना दिली अर्थार्जनाची संधी 
सणांच्या वेळी चीनच्या बाजारपेठेतून सुमारे साडेचारशे कोटींच्या विद्युत माळा विक्रीला येतात. या माळा बनविण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्याबाबत विचार मनात आला आणि पुणे, कोल्हापूर भागांत आम्ही महिलांना प्रशिक्षित केले. माळा बनविण्याच्या कामातून त्यांनी साडेचार कोटींचा व्यवसाय केला, असेही पवार यांनी सांगितले.

Web Title: 19th anniversary of Marathwada edition of Sakal