ट्रक-कारच्या धडकेत दोन ठार, तिघे गंभीर जखमी

दीपक बरकसे
गुरुवार, 25 एप्रिल 2019

वैजापूर : नागपूर-मुंबई महामार्गावरील शिवराई फाटा (ता.वैजापूर, जि. औरंगाबाद) येथे कार व ट्रकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत  दोन ठार, तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरूवारी (ता. 25) पहाटे चारच्या दरम्यान घडली. अद्याप मृत व जखमींची नावे कळू शकली नाही. वैजापूर पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

ट्रक (एमएच 15 बीजे 7858) हा औरंगाबादहून वैजापूरकडे भंगार घेवून जात असताना  कारमधून पाच जण (एम एच 4 जीएम 6425) नाशिकहून औरंगाबादकडे येत असताना शिवराई फाटा येथे समोरासमोर धडक झालीली. यात दोघांचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी वैजापूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांना औरंगाबाद येथील घाटीत हलविण्यात आले. पाच ही जण मुंब्रा येथिल राहणारे असुन ते केटरिंगचे व्यवसाय करत होते.

Web Title: 2 died and 3 injured in car and truck accident