पोलिस निरीक्षकासह दोन कर्मचारी लाचेच्या जाळ्यात

bribe
bribe

नांदेड : तक्रारदाराच्या चुलत्याने दिलेली तक्रारीत कारवाई न करण्यासाठी किनवट पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप तिडके यांच्या या सांगण्यावरून पोलीस कर्मचारी पांचाळ आणि त्याचा एक सहकारी या तिघांनी तक्रारदारकडे लाच मागितली.

याप्रकरणी लाचलुचपतचे पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बळवंत पेडगावकर यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री नऊ वाजता किनवट पोलीस पोलीस ठाणे परिसरात कारवाई करून पन्नास हजाराची लाच घेताना पोलिस नाईक मधुकर पांचाळ आणि त्याचा साथीदार पांडुरंग बोईनवाड यांना अटक केली.

पोलिस निरीक्षक मात्र फरार झाल्याचे एसीबी सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी रात्री उशिरा किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com