कर्नाटकातील चोरी लातूर पोलिसांकडून उघड, दोन अटक

हरी तुगावकर
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

लातूर : कर्नाटकात चोरी करणाऱया दोघांना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून बसवकल्याण (कर्नाटक) येथून चोरून आणलेले दोन ट्रॅक्टर व एक मोटार सायकल असा एकूण पंधरा लाखाचा माल जप्त केला आहे.

लातूर : कर्नाटकात चोरी करणाऱया दोघांना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून बसवकल्याण (कर्नाटक) येथून चोरून आणलेले दोन ट्रॅक्टर व एक मोटार सायकल असा एकूण पंधरा लाखाचा माल जप्त केला आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पोलिस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या मोहिम राबविल्या जात आहेत. चार दिवसापूर्वीच आॅलआऊट अॉपरेशनमध्ये तीघांना अटक करून दोन गावठी पिस्टल व पाच काडतुसे पोलिसांनी जप्त केली होती. आता कर्नाटक राज्यात चोरी करणाऱय़ा दोघांना आता अटक करण्यात आली आहे. स्थानिक गु्न्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे व सहायक पोलिस निरिक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने रेकॉर्डवरील वाहन चोरी करणाऱयांच्या माहिती घेण्यास सुरवात केली आहे. ता. लिंबाळा (ता. औसा) येथील शिवारात रतन मलू धुळे (रा. लिंबाळा) व सुभाष रघुनाथ सूर्यवंशी (रा. हेळंब)
चोरीचे वाहने आणून ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे छापा टाकला. यात दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून शेतात ठेवलेले चोरीचे दोन ट्रॅक्टर व एक मोटार सायकल असा एकूण पंधरा लाखाचा माल जप्त केला आहे.

या दोघांची पोलिसांनी अधिक चौकशी केली. यात त्यांनी बसवकल्याण (कर्नाटक) येथून हे ट्रॅक्टर व मोटारसायकल चोरून आणल्याचे कबूल केले आहे. या प्रकरणी बसवकल्याण पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. रतन धुळे याच्यावर या पूर्वीही वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या कार्यवाही करीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नागरगोजे, सहायक पोलिस निरीक्षक बावकर, फौजदार शमशोद्दीन काझी, राजेंद्र टेकाळे, रामहरी भोसले, प्रकाश भोसले, नागनाथ जांभळे यांनी पुढाकार घेतला.

अपहरण, बलात्कारातील आरोपी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या या दोन्ही आरोपीवर काही दिवसापूर्वी देवणी पोलिस ठाण्यात एका मुलीचे अपहरण करून तीच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या दोघांना देवणी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title: 2 robbers caught by latur police