अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 20 वर्षे सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथील रहिवासी असलेली नवव्या वर्गातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस १० व ११ एप्रिल २०१५ रोजी येळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या खिचडी शिजविण्याच्या खोलीत आरोपी अक्षय भिमराव कपाटे याने जिवे मारण्याची धमकी देवून अत्याचार केला.

नांदेड : अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथील एका अल्पवयीन मुलीस मोटारसायकलवर बसवून नेवून निळा शिवारात अत्याचार करणार्या नराधमास प्रमुख न्यायाधीश दिपक धोळकिया यांनी २० वर्ष सक्तमजूरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सबळ पुराव्याअभावी दोघांची निर्दोष मुक्तता केली.

अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथील रहिवासी असलेली नवव्या वर्गातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस १० व ११ एप्रिल २०१५ रोजी येळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या खिचडी शिजविण्याच्या खोलीत आरोपी अक्षय भिमराव कपाटे याने जिवे मारण्याची धमकी देवून अत्याचार केला. त्यामध्ये नवनाथ केशव कपाटे व सदाशिव देविदास कपाटे या दोघांनी त्याला मदत केली. दरम्यान १२ एप्रिल २०१५ रोजी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास जवळा बोरगावकडे जाणाNया मार्गावरुन पिडीत मुलगी शेताकडे जात असतांना यातील आरोपी अक्षय कपाटे व सदाशिव कपाटे याने तिला मोटारसायकलवर बसती की नाही, असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने बसवून तिला निळा शिवारात घेवून गेले. यावेळी तिच्यावर अक्षय कपाटे याने जबरदस्तीने अत्याचार केला.

या प्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन अर्धापूर पोलिसांनी तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करणारे उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर औटे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात न्यायालयाने ९ साक्षीदार तपासले. दरम्यान प्रमुख जिल्हा न्यायाधिश दिपक धोळकिया यांनी आरोपी अक्षय कपाटे यास २० वर्ष सक्त मजूरी व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली तर इतर दोघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू अ‍ॅड. संजय लाठकर यांनी सांभाळली..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 years jail for rape on minor girl in Nanded