esakal | बीडमध्ये दाेनशे खाटांचे रुग्णालय लवकरच उभे राहणार
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

बीडमध्ये दाेनशे खाटांचे रुग्णालय लवकरच उभे राहणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड - जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या आणि उपलब्ध खाटांची संख्या याचे प्रमाण विषम झाल्याने रुग्णांची होणारी प्रचंड हेळसांड कमी होण्याच्या दृष्टीने एक टप्पा पूर्ण होत आहे. नवीन 200 खाटांच्या इमारतीची पायाभरणी पूर्ण झाली असून आता पिलरही उभे राहिले आहेत. सुरवातीपासून "सकाळ'ने हा रुग्णांच्या जिव्हाळ्याचा विषय लावून धरला. साधारण 80 कोटी रुपये यासाठी खर्च होणार आहेत. 


जिल्हा रुग्णालयात खाटांची संख्या 300, तर आंतररुग्णांची संख्या नेहमीच पाचशेच्या घरात असते. त्यामुळे रुग्णांची मोठी हेळसांड होते. महिला व बालरुग्ण विभागात चक्क फरशांवर गाद्या टाकून बाळंत महिलांना नवजात बालकांसह व गर्भवतींना उपचार घेण्याची वेळ येते. त्यामुळे खाटांची संख्या वाढविण्याची गरज होती.

पाच वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने 200 खाटांच्या विस्तारीत रुग्णालयाला मान्यता दिली. साधारण चार वर्षे जागा उपलब्धतेसाठी आणि त्यानंतर मंजुरी व निधीसाठी वेळ लागला. अखेर आचारसंहितेपूर्वी 79 कोटी रुपयांच्या या बांधकामाच्या अंदाजपत्रकाला मान्यता भेटून कामाला सुरवात झाली आहे. आता पायाभरणी पूर्ण होऊन पिलरही उभे राहत आहेत. पाच मजल्यांची ही इमारत असून येथे अनेक सुविधा असणार आहेत. त्यामुळे काही काळाने जिल्हा रुग्णालयातील खाटांअभावी होणार हेळसांड कमी होणार आहे. 

loading image