सोयाबीनच्या 21  नमुन्याचे विक्री बंदचे आदेश

21 crops sample ban of soyabean
21 crops sample ban of soyabean

लातूर : जिल्ह्यात ठिकठिकाणी घेण्यात आलेल्या सोयाबीनच्या नमुन्यापैकी उगवणशक्ती तपासणीत 21 नमुने नापास झाले आहेत. त्यामुळे या नमुन्याचे बियाणे विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ही कारवाई केली आहे.

जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या कृषि अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणच्या कृषि
सेवा केंद्रातून ही बियाणांचे नमुने घेतले आहेत. यात लातूर तालुक्यात 24, औसा 20, निलंगा 20, अहमदपूर 20, उदगीर 24, चाकूर 21, रेणापूर 25, जळकोट  19, देवणी 14 व शिरुर अनंतपाळ तालुक्यातील 18 असे एकूण 205 नमुने घेण्यात आले होते. 

याची उगवणशक्ती तपासणीसाठी परभणीच्या शासकीय बीज परिक्षण प्रयोगशाळेत पाठविण्यात आली होती. यातील 21 नमुने उगवणशक्ती तपासणीत  नापास झाली आहेत. त्यामध्ये 

महाबीज अकोला सोयाबीन MAUS लॉटनंबर 71 Oct 17-13, 2501-1157, 354, 
सोयाबीन JS -335 लॉटनंबर Oct-17-13-2201-1960, 1687,
Feb-18-01-817(P)AT-3727, Oct-17-13-2501-57, Oct-17-13-2501-55, 

स्वस्तीक अॅग्रो सीडस-सोयाबीन JS 335- लॉट नंबर Feb-18-01-917(P)AT 3707,

रायझींग सीडस सोयाबीन (RS 228) (RS 363) लॉट नंबर 36587, 36762, 
उत्सव  अॅग्रोटेक सोयाबीन JS 335 लॉट नंबर 810-41108,
कृषीधन सीडस सोयाबीन 601-लॉट नंबर JOK 200866, 
अॅग्रीटेक अॅग्रो प्रॉडक्टस लातूर सोयाबीन DS -228 लॉट नंबर 223,
इगल सीडस सोयाबीन JS 335 लॉट नंबर 50273, 74167, 1198-49537,
ग्रीन गोल्ड औरंगाबाद सोयाबीन JS 335 लॉट नंबर 17-13-2002,

नोव्हा गोल्ड सीडस सोयाबीन DS 228 लॉट नंबर 181303-8011,
महागुजरात सीडस सोयाबीन DS0228 लॉट नंबर MG 106, MG 116.
 या सर्व नमुन्यांचे विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत. या बियाणामुळे
शेतकऱय़ांचे मोठे नुकसान झाले आहे.

उगवणशक्ती तपासणीत नापास झालेल्या बियाणांच्या उत्पादक कंपनी व कृषी
सेवा केंद्राविरुद्ध बियाणे अधिनियम 1966 व नियम 1968 तसेच नियंत्रण आदेश 1983 मधील तरतुदीनुसार न्यायालयात केस करण्याची कारवाई सुरु आहे. दरम्यान
आणखी 167 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात देवणी एक, अहमदपूर 17, चाकूर
चार, उदगीर 24, निलंगा 66, रेणापूर सात, लातूर 17 व औसा तालुक्यातील 33 
तक्रारी आहेत. त्याचीही तपासणी सुरु आहे.

-भिमराव रणदिवे, जिल्हा कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com