जालन्यात पकडली 21 लाखांची कॅश 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

जालना - हजार व पाचशेच्या चलनी नोटांवरील बंदी आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर काळ्या पैशांचे व्यवहार वाढले आहेत. जालना शहरात निवडणूक दक्षता पथकांनी सोमवारी (ता.14) दुपारी दोन वेगवेगळ्या कारवाईत एकवीस लाखांची रोख रक्कम जप्त केली. जप्त केलेल्या सर्व नोटा हजार व पाचशे रुपयांच्या आहेत. 

जालना - हजार व पाचशेच्या चलनी नोटांवरील बंदी आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर काळ्या पैशांचे व्यवहार वाढले आहेत. जालना शहरात निवडणूक दक्षता पथकांनी सोमवारी (ता.14) दुपारी दोन वेगवेगळ्या कारवाईत एकवीस लाखांची रोख रक्कम जप्त केली. जप्त केलेल्या सर्व नोटा हजार व पाचशे रुपयांच्या आहेत. 

जालना शहरात नगरपालिकेच्या निवडणूक दक्षता पथकांनी रविवारी तब्बल 30 लाखांची बेकायदेशीर रोख रक्कम जप्त केली. आयकर विभागाकडून याबाबतची चौकशी सुरू असतानाच आज पुन्हा दोन कारमधून नेण्यात येत असलेली मोठी रक्कम जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. निवडणूक विभागाचे दक्षता पथक दुपारी बारा वाजता मंठा चौफुलीवर वाहनांची तपासणी करत असताना, नांदेडहून येणाऱ्या कार (क्र. एमएच 26, व्ही.569) मध्ये 15 लाखांची रोख रक्कम आढळून आली. पथकातील अधिकाऱ्यांनी कारमधील लक्ष्मण माणिकराव येजगे (वय 54 रा. नांदेड) व नोकर भवानी मिश्रा यांच्याकडे चौकशी केली. मात्र, त्यांना रोख रकमेबाबत योग्य स्पष्टीकरण देता आले नाही. पथकातील अधिकाऱ्यांनी कारसह रोख रक्कम जप्त केली. पंचनामा करून रोख व कार सदर बाजार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. आयकर विभागाला माहिती देण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी सांगितले. अन्य एका कारवाईत पालिकेच्या पथक क्रमांक दोनमधील अधिकारी एम. एम. बजंत्री हे कर्मचाऱ्यांसह कन्हैयानगर टी पॉइंटवर दुपारी चार वाजता वाहनांची तपासणी करत होते. देऊळगावराजाकडून आलेल्या एका स्विफ्ट कारची (क्र. एमएच 15, ईपी. 7965) तपासणी केली असता, कारच्या मागील सीटवर मफलरमध्ये सहा लाख 16 हजार रुपये आढळून आले. कारचालक माधव ठुबाजी पवार, व मालक राजमल घेवरचंद मुनोद (वय 48, रा.लासलगाव, जि.नाशिक) यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांना समाधानकारक माहिती देता आली नाही. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने पालिका पथकाने सदर रक्कम ताब्यात कारसह ताब्यात घेतली. या प्रकरणाची चंदनझिरा ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: 21 lakh cash clamped to the Jalna

टॅग्स