इंग्रजी शाळा सोडून २११ विद्यार्थी झेड.पी. शाळेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

गंगापूर - इंग्रजी शाळेला सोडचिठ्ठी देऊन तालुक्‍यातील दोनशे अकरा विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांत धाव घेतली आहे. पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्‍चित केला आहे. ही माहिती गटशिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, विस्तार अधिकारी मनीषा वाशिंबे यांनी दिली. 

गंगापूर - इंग्रजी शाळेला सोडचिठ्ठी देऊन तालुक्‍यातील दोनशे अकरा विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांत धाव घेतली आहे. पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्‍चित केला आहे. ही माहिती गटशिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, विस्तार अधिकारी मनीषा वाशिंबे यांनी दिली. 

लोकसहभागातून बदललेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांना नव्या उमेदीच्या शिक्षकांची जोड मिळाल्याने तालुक्‍यात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. इंग्रजी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची केंद्रनिहाय संख्या अशी, गंगापूर (७), जामगाव (८), कायगाव (६) , मांजरी (१६),  सिद्धनाथ वाडगाव (१२), शिल्लेगाव (११) माळीवाडगाव (८), डोणगाव (७), आसेगाव (१०), मालुंजा (१८), ढोरेगाव (५),  सावखेडा (७), शेंदूरवादा (१७), तुर्काबाद (१२), वाळूज (२२), आंबेलोहळ (१४), गाजगाव (४), रांजणगाव पोळ (१७), लासूर स्टेशन (१०). विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर करून सर्वांगीण विकास घडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकीत आहेत. गुणवत्तेत एक-एक पाऊल पुढे टाकीत आहेत. यासाठी शिक्षकांसह लोकसहभागही महत्त्वाचा दुवा ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळावी यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहेत. अनेक शिक्षक पदरमोड करीत अतिरिक्त वेळ देऊन शाळेला डिजिटल बनविण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीसह लोकसहभागाचा वाटा मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या शाळा
एकूण जिल्हा परिषद शाळा     : २३७
डिजिटल शाळा     : २३७
आयएसओ दर्जाच्या शाळा     : १८
लोकसहभाग     : ८२ लाख
प्रगत शाळा     : १८५
उपक्रमशील शाळा     : २३७
खासगीतून जिल्हा परिषदेत
दाखल झालेले विद्यार्थी     : २११

Web Title: 211 students from the English School leaving ZP At school