21 हजार 749 शाळांमध्ये गॅस कनेक्‍शनची सुविधा

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

औरंगाबाद : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत ज्या शाळांनी अद्यापही एलपीजी गॅस कनेक्‍शन घेतलेले नाहीत. अशा शाळांना आता सबसिडीमध्ये जवळपास 1600 रुपयांत गॅस कनेक्‍शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसे पत्र शिक्षण संचालक यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. सध्या राज्यभरातील 86 हजार शाळांपैकी केवळ 21 हजार 749 शाळांनाच गॅस कनेक्‍शनची सुविधा उपलब्ध आहे. टक्केवारीचा विचार करता हे प्रमाण केवळ 27 आहे.

राज्यात अनेक शाळेत शालेय पोषण आहार हा चुलीवरच शिजवला जातो. त्यामुळे राज्यात जवळपास 86 हजार शाळांपैकी 21 हजार 749 शाळांमध्ये गॅस कनेक्‍शन आहे. इतर शाळांमध्ये गॅस नसल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी सबसिडीमध्ये गॅस उपलब्ध करून देण्यासाठी भारत पेट्रोलियम, पुणे, हिंन्दुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली.

संदीप पवार, प्रबंधक विक्रीय (एलपीजी) भारत पेट्रोलियन कॉर्पोरेशन, पुणे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. यामध्ये वर्षाला 12 सिलिंडर सबसिडीमध्ये देता येते, अशी माहिती देण्यात आली. यामध्ये प्रति एक सिलिंडर कनेक्‍शनचा रेट 1450, दोन सिलिंडरकरिता कनेक्‍शन रेट 2900, रेग्युलेटर रेट 150, नळी 190, कागदपत्रे कार्ड 100 रुपये असा चार्ज आहे. त्यामुळे आता सबसिडीमध्ये गॅस कनेक्‍शन घेण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहे.

Web Title: 21,749 schools have gas connection