नांदेडमधील 22 एपीआय झाले पीआय

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 8 डिसेंबर 2018

नांदेड : जिल्ह्यात मागील काही वर्षापासून कार्यरत असलेल्या 22 सहाय्यक पोलिस निरीक्षकांना पोलिस निरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. यात राज्य गुप्त वार्ता, विशेष सुरक्षा विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक आणि नांदेड पोलिसांंचा समावेश आहे. 

पोलिस महासंचालक कार्यालयाने सहा डिसेंबर रोजी राज्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. पदोन्नती झालेल्या या अधिकाऱ्यांना लवकरच पोस्टींग मिळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पदोन्नती झालेल्यांमध्ये राज्य गुप्त वार्ताचे प्रकाश वांद्रे, लाचलुचपत प्रतिबंधकचे सुनिता शिंदे, बळवंत पेडगावकर, भूजंग गोडबोले, विशेष सुरक्षा विभागाच्या अरूणा सुगावे, प्रफुल्ल अंकुशकर, पांडूरंग गवते, जिल्हा विशेष शाखेचे वैजनाथ मुंडे, दिलीप तारे, वजिराबादचे विश्‍वनाथ नाईकवाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे विनोद दिघोरे, वाहतुक शाखेतील रफीक सय्यद, पीसीआरच्या मनिषा कदम, उस्मानगरचे नितीन चिंचोळकर, रामतिर्थचे अशोक जाधव, कुंडलवाडीचे विनोद कांबळे, उमरीचे विश्‍वंभर पल्लेवाड, कंधारचे संदीप भारती, इतवाराचे श्रीनिवास रोयलावार, मुक्रमाबादचे सुनिल नाईक, सी. क्युबचे नितीन इंद्राळे, मनाठा ठाण्याचे रमाकांत पांचाळ आणि सध्या कारागृहात असलेले दिनेश सोनसकर यांचाही समावेश आहे.   

Web Title: 22 API from Nanded police promote as a PI