बावीस हजार रुग्णांना 'जनआरोग्य'चा लाभ 

pmjay
pmjay

जालना - जिल्ह्यात दारिद्य्ररेषेखाली तसेच दारिद्य्ररेषेवरील कुटुंबांना महात्मा फुले जनआरोग्य योजना वरदान ठरत आहेत. गेल्या सहा वर्षांत जिल्ह्यातील विविध आजारग्रस्त 22 हजार 982 रुग्णांना या आरोग्य योजनेचा लाभ मिळाला आहे. 
वाढत्या महागाईच्या काळात आरोग्यसेवाही महागल्या आहेत. आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना उपचार घेण्यासाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणे शक्‍य नसते. सर्वसामान्य रुग्णांना मोफत उपचार घेता यावेत, नऊशेहून अधिक आजारांवर मोफत उपचाराची सुविधा असलेली "महात्मा फुले जनआरोग्य योजना' रुग्णांना वरदान ठरत आहे. वर्ष 2013 पासून ते आतापर्यंत 22 हजारांहून अधिक रुग्णांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. 


जिल्हा शासकीय रुग्णालयास जालना शहरातील आठ खासगी रुग्णालयांत या रुग्णांनी उपचार व शस्त्रक्रिया केल्या. यासाठी 114 कोटी 90 लाख 82 हजार रुपये खर्च आल्याची माहिती योजनेचे जिल्हा समन्वयक मिलिंद जोशी यांनी दिली. 
 
जिल्ह्यातील नऊ रुग्णालयांत सेवा 
जिल्ह्यातील एक शासकीय व आठ खासगी रुग्णालयांत या योजनेअंतर्गत उपचार देण्यात येत आहे. तीस खाटांपेक्षा अधिक क्षमता असलेल्या रुग्णालयांची निवड या योजनेसाठी करण्यात आली आहे. यात जालना शहरातील दीपक हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल, गणपती नेत्रालय, मंत्री सर्जिकल, ओम मल्टिस्पेशिलिस्ट, चिरंजीव बालरुग्णालय, जालना मिशन हॉस्पिटल यांचा समावेश आहे. संबंधीत रुग्णांना योजनेच्या लाभासाठी या रुग्णालयात आरोग्य मित्रांची नेमणूक करण्यात आली आहे. 
 
या आजारांसाठी मिळते सुरक्षा कवच 
योजनेअंतर्गत तीस विशेष सेवांतर्गत 971 उपचार व शस्त्रक्रिया; तसेच 121 पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. या योजनेत लाभार्थ्यांना सर्वसाधारण शस्त्रक्रिया, नेत्रशस्त्रक्रिया, स्त्रीरोगावरील शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, हृदयशस्त्रक्रिया व उपचार, जठर व आतड्याच्या शस्त्रक्रिया व उपचार, बालरोग शस्त्रक्रिया व उपचार, मेंदू व मज्जासंस्था यांचे आजारावरील शस्त्रक्रिया व उपचार, प्लॅस्टिक सर्जरी, जळीत रुग्णावरील उपचार, कृत्रिम अवयव, आकस्मिक वैद्यकीय उपचार, त्वचेच्या, सांध्याच्या व फुफ्फुसाच्या आजारावरील आकस्मिक उपचार आदी उपचारांचा लाभ मिळतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com