संधीसाधूंनी लुटला 23 लाखांचा माल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

औरंगाबाद - दंगलीचा फायदा घेऊन अनेक दुकानांतील माल लुटल्याच्या घटना घडल्या. यात राजाबाजार येथील दुकानात 23 लाख बावीस हजार पाचशे रुपयांच्या सामानाची चोरी झाली. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात रविवारी (ता. 13) गुन्ह्याची नोंद झाली. 

पोलिस तक्रारीनुसार, मोहम्मद शाकेर अब्दुल रहीम हिंगोरा यांचे शहागंज येथील राठी कॉर्नर येथे कॉम्प्युटरचे दुकान आहे. दंगलकाळात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर त्यांच्या दुकानाचे अनोळखी व्यक्तींनी शटर उचकटून दुकानातील कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि एक लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली. 

Web Title: 23 lakh loot in aurangabad

टॅग्स