परभणीतील 24 मंडळात अतिवृष्टी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

परभणी : परभणी जिल्ह्यात बुधवार पासून पावसाने जोर धरला आहे. शुक्रवारी (ता.17) पहाटे आठ वाजे पर्यंत जिल्ह्यात  72.86  मिलिमीटर पाऊस झाला आहे.तर जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील  24 महसुल  मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

सव्वा महिण्यापासून दडी मारलेल्या पावसाचे बुधवारी (ता.15) रात्री आगमन झाले आहे.त्यानंतर अद्याप पर्यंत पाऊस सुरुच आहे.गुरुवारी दिवसभर सर्वच जिल्ह्याला झोडपुन काढल्यानंतर रात्रभर पावसाचा तडाखा सुरु होता.या पावसामुळे नदी-नाल्यांना पुर आला आहे.जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, दुधना, पूर्णा नदिच्या पात्रात चांगली वाढ झाली असून नदी काठच्या गावांना 

प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.शुक्रवारी पहाटे आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात पावसाची 72.80 मिलीमिटर नोंद झाली आहे.जून पासून आता पर्यंत 380.16 अर्थात 49.01 टक्के पाऊस झाला आहे.आणखी दोन दिवस जोरदार पाऊस राहील अशी शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.
सिंगणापूर-68,झरी-88,पेडगाव-69,जांब-56,पूर्णा-104,ताडकळस-69,चुडावा-79,सोनपेठ-94,सेलु-137,देऊळगाव-85,कुपटा-88,वालूर-83,चिकलठाणा-108,पाथरी-412,बाभळगाव-80,हादगाव-79,जिंतूर-104,सावंगी-94,बोरी-76,चारठणा,83,बामणी-124,मानवत-133,केकरजवळा-79,कोल्हा-68 या मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
 
Web Title: 24 mandal from parbhani have heavy rain